Monday, 26 February 2018

Inaternational Marathi Language Day / Marathi Bhasha Din


'लीळाचरित्र' हा म्हाइम्भटांनी इ.स. १२८३ च्या सुमारास लिहिलेला ग्रंथ आहे.तो मराठीतील आद्य चरित्रग्रंथ असून त्यात महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधरस्वामी यांचे सविस्तर चरित्र, त्यांच्या आठवणी व आख्यायिका यांच्या रूपाने आले आहे. या सर्व आठवणी व्यावहारिक गद्यात लिहिल्रल्या असल्याने तत्कालीन मराठी भाषेचे लौकिक स्वरूप, की जे ज्ञानेश्वरी सारख्या काव्य ग्रंथावरून कळू शकत नाही, ते कळण्याचे उत्कृष्ट व विश्वसनीय साधन या ग्रंथाच्या रूपाने आपल्या हाती येते. 'विश्वसनीय' म्हणण्याचे कारण असे, की हे चरित्र म्हाइम्भटांनी चक्रधरांच्या पश्चात त्यांच्या सहवासात असलेल्या त्यांच्या अनेक शिष्यांना विचारून व त्यातील खऱ्याखोट्याची पारख करून घेऊन लिहिलेले आहे. तसेच ते लिहिल्यानंतर लौकरच महानुभावांच्या इतर ग्रंथांप्रमाणे हा चरित्रग्रंथहि त्यांच्या सांकेतिक लिपीत ( सकळ आणि सुंदरी ) गेला व त्यामुळे त्याचे मूळ स्वरूप पुष्कळसे अबाधित राहिले. म्हणून प्राचीन मराठी भाषेचे, सर्वसामान्य व्यवहारात बोलल्या जाणाऱ्या यादवकालीन मराठीचे आकलन होण्याच्या दृष्टीने म्हाइम्भटांचा हा ग्रंथ केवळ अनमोल आहे. _ शं. गो. तुळपुळे
श्रीचक्रधरस्वामिंच्या म्हाइम्भटांनी लिहिलेल्या लीळाचरित्रातील हा वेचा. या मध्ये श्रीचक्रधरस्वामी देवाच्या रूपाचा उलगडा करतात.

Pen and ink on MDF board.

Tuesday, 13 February 2018

Vinda for Valentine Day.

From marathi poet Vinda Karandikar. Happy Valentine Day!