'लीळाचरित्र' हा म्हाइम्भटांनी इ.स. १२८३
च्या सुमारास लिहिलेला ग्रंथ आहे.तो मराठीतील आद्य चरित्रग्रंथ असून त्यात
महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधरस्वामी यांचे सविस्तर चरित्र, त्यांच्या आठवणी
व आख्यायिका यांच्या रूपाने आले आहे. या सर्व आठवणी व्यावहारिक गद्यात लिहिल्रल्या
असल्याने तत्कालीन मराठी भाषेचे लौकिक स्वरूप, की जे ज्ञानेश्वरी सारख्या काव्य
ग्रंथावरून कळू शकत नाही, ते कळण्याचे उत्कृष्ट व विश्वसनीय साधन या ग्रंथाच्या
रूपाने आपल्या हाती येते. 'विश्वसनीय' म्हणण्याचे कारण असे, की हे चरित्र
म्हाइम्भटांनी चक्रधरांच्या पश्चात त्यांच्या सहवासात असलेल्या त्यांच्या अनेक
शिष्यांना विचारून व त्यातील खऱ्याखोट्याची पारख करून घेऊन लिहिलेले आहे. तसेच ते
लिहिल्यानंतर लौकरच महानुभावांच्या इतर ग्रंथांप्रमाणे हा चरित्रग्रंथहि त्यांच्या
सांकेतिक लिपीत ( सकळ आणि सुंदरी ) गेला व त्यामुळे त्याचे मूळ स्वरूप पुष्कळसे
अबाधित राहिले. म्हणून प्राचीन मराठी भाषेचे, सर्वसामान्य व्यवहारात बोलल्या
जाणाऱ्या यादवकालीन मराठीचे आकलन होण्याच्या दृष्टीने म्हाइम्भटांचा हा ग्रंथ केवळ
अनमोल आहे. _ शं. गो. तुळपुळे
श्रीचक्रधरस्वामिंच्या म्हाइम्भटांनी
लिहिलेल्या लीळाचरित्रातील हा वेचा. या मध्ये श्रीचक्रधरस्वामी देवाच्या रूपाचा
उलगडा करतात.
Pen and ink on MDF board.
No comments:
Post a Comment